✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर.

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिर येथे अधिक श्रावण मास (पुरुषोत्तम मास) चे औचित्य साधून दि. १३ व दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी पुरुषोत्तम याग या धार्मिक विधानाचे आयोजन करण्यात आले आहे.” शिवस्य हृदयं विष्णु विष्णूश्च हृदयं शिवम या उक्ती प्रमाणे दुग्ध शर्करा योग म्हणून या विधानाचे आयोजन केले आहे.रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ ( श्रावण कृष्ण द्वादशी ) सकाळी. ८:३० ते दुपारी १ वा. धार्मिक विधी, सायं. ५ ते ७ वा. सर्व भाविकांसाठी श्री. विष्णवे नमो या नाममंत्राचा जप, सायं. ७:३० वा. ह. भ. प. श्री. सदाशिव पाटील यांचे कीर्तन.सोमवार दि. १४ ऑगस्ट २०२३ ( श्रावण कृष्ण त्रयोदशी ) सकाळी. ८:३० ते दुपारी १ वा. धार्मिक विधी, दुपारी १:३० ते ३ वा. महाप्रसाद आणि सायं ७:३० वा. भजने.अशाप्रकारे पुरुषोत्तम याग या कार्यक्रमानिमित्त श्री. देव कलेश्वर मंदिर नेरूर येथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, नेरूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page