✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
संपूर्ण देशात होत असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त माणगाव आंबेडकर नगर येथील बुद्ध विहार मध्ये जाऊन पत्रकार कृष्णा सावंत यांनी अभिवादन केले माणगाव आंबेडकर नगर येथील बाबासाहेबांच्या सर्व अनुयायांनी आज संपूर्ण दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते
यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बाबासाहेबांनी घेतलेले शिक्षण, तयार केलेली घटना, शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा या त्रिसूत्री बद्दल विचार व्यक्त केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन च्या माध्यमातून औरंगाबाद येथे पहिले मिलिंद कॉलेज स्थापन केले या मिलिंद कॉलेजचा मी विद्यार्थी असल्याने मला बाबासाहेबांबद्दल अभिमान आहे कारण बाबासाहेबांनी स्वतः पाया रचलेल्या मिलिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळेच आज दहा वर्ष मी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक असल्याचे सांगितले. त्यामुळे बाबासाहेबांनी बांधलेल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेता आले हेच आपलं भाग्य आहे आणि म्हणून त्यांच्या विचारांना पुढे नेत आपण काम केलं पाहिजे असे उद्गार काढले.यावेळी व्यासपीठावर नागेश कदम श्री महादेव कदम श्री वसंत कदम श्री रुपेश जाधव आदी उपस्थित होते.
