✍🏼लोकसंवाद /- बांदा.
काजू हंगामात मडुरा रेखवाडी येथील शेतकरी पांडुरंग सहदेव राऊळ यांच्या दोन एकरवर असलेल्या काजू बागेतील उत्पन्न देणारी सुमारे दोनशे काजू झाडे जळाली.या घटनेत सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवित हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शनिवारी मध्यरात्री रेखवाडी येथील राऊळ यांच्या काजूबागेत अचानक आग लागली. सद्यस्थितीत काजू हंगाम सुरू असून दर दिवसा हजारो रुपयांचे काजू बी गोळा केली जाते. उत्पन्न देणारी कलमे जळाल्याने आमचे खूप मोठे नुकसान झाले. दोन एकरवरील जागेत असलेली 200 कलमे जळाली. यात दोन लाखांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला.आग विआझविण्यासाठी दिनेश राऊळ, प्रवीण राऊळ, अमोल राऊळ यांनी प्रयत्न केले. परंतु सकाळपर्यंत आग असल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न तोकडे पडले. दरम्यान आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
