सावंतवाडी /-
सावंतवाडी जेल अंतर्गत कोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास खिडकीला चादर बांधून त्याने पळ काढला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे.
त्यानंतर तेथे ड्युटीवर असलेल्या ओरोस मुख्यालयांतर्गत पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून याबाबतची खबर जेल प्रशासनाकडून सावंतवाडी पोलिसांनाही देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावंतवाडी जेलमधील काही आरोपींना कोलगाव आयटीआय येथे जेल तयार करून तेथे ठेवण्यात आले होते. यातीलच हा आरोपी होता. दरम्यान, सावंतवाडी जेलर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्या सह पोलिसही घटनास्थळी पोहोचले असून आहेत. संबंधित आरोपी हा पडवे कसाल येथील असल्याची माहिती ण्णासो बाबर यांनी दिली असून त्याचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.