कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी कोचरा या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी देऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन केली विकासात्मक कामाबाबत चर्चा केली रस्त्याबाबतचे निवेदन दिले कुडाळ तालुक्यातील पाट परुळे रस्त्याला लागुन पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी हा रस्ता गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिला आहे या रस्त्याचा काही भाग कुडाळ तालुक्यामध्ये येतो उर्वरित भाग तालुक्यात समाविष्ट असल्याने दुर्लक्षित राहिला आहे सद्यस्थितीत या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले आहे प्रवासी व पादचारी यांनासुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे महेश राऊळ,कपिल राऊळ, श्री गोसावी यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन निवेदन दीले यावेळी आमदार नाईक यांनी सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दीली दिल्याने ग्रामस्थांनी समाधान मानले.