▪️माणगाव ग्रामपंचायत सरपंचाच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
माणगाव धरणवाडी रस्त्यासाठी सलग दुसऱ्यांदा ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कासाठी धरणवाडीतील जेष्ठ नागरिक महिला ग्रामस्थ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.गेली ४० वर्ष या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत.तरीही त्याच्या न्याय हक्कासाठी कुठलेही शासन स्तरावर दखल घेताना दिसून येत नाही.आतातरी आपल्या हक्काचा रस्त्याची मागणी पुर्ण करावी आम्हाला योग्य न्याय मिळावा प्रशासनाने आमचा अंत पाहू नये.यावेळी धरणवाडीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
