लोकसंवाद /- कुडाळ.

ग्राहक सेवा हा बँकेचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच ग्राहकांना कमीत कमी वेळेत महाबँकेच्या माध्यमातून सेवा मिळावी, यासाठी बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे गोवा पणजी डेप्युटी झोनल मैनेजर आनंद डिंगणकर यांनी आज केले.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक माळगावकर यांच्या जागेत ग्राहक सेवा केंद्र आजपासून सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन डिंगणकर व एलडीएम मुकेश मेश्राम यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बँक अधिकारी नभास देवघर, महाबैंक कुडाळ,शाखाधिकारी ब्रजेश सुर्वे, उद्योजक एस. पी. सामंत, स्नेहल सामंत, दीपक राऊत, दीपश्री राऊत, सायली सामंत, सुजय सामंत, योगेश माळगावकर, विपीन मंत्रवादी, रवींद्र मांजरेकर होते. सुधीर राऊत,
नाना मयेकर गोरांग राऊत, गौरी सामंत, सुकृत करलकर, साईओम राऊत, ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधी वैष्णवी राऊत, श्रीकृष्ण वायंगणकर आदी उपस्थित होते.

योजना व इतर वाढते कामकाज लक्षात घेता ग्राहकांना वाढल्या गर्दीचा त्रास न होता कमीत कमी वेळेत त्यांना चांगली सेवा देता, यासाठी हे ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहे.या केंद्राच्या माध्यमातून बँकिंग कामकाजासह सामाजिक सुविधा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात, असा उद्देश आहे. यातून बँक व ग्राहक यांच्यातील ऋणानुबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एलडीएम मुकेश यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शाखाधिकारी ब्रजेश ज्यांनी या ग्राहक सेवेमुळे बँकेत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चांगली सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले. केंद्राच्या प्रतिनिधी वैष्णवी राऊत यांनी विविध डिंगणकर यांनी बँकेच्या विविध विमा योजनांबाबत मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page