कुडाळ येथे मेडिएशन ट्रेनिंग प्रोग्रॅमचे झाले उद्घाटन..
कुडाळ /-
जेव्हा वकील वादी आणि प्रतिवादी मध्ये मध्यस्थी म्हणून काम पाहतील त्यावेळी न्यायाधीशाच्या वेदना काय असतात हे नक्की समजेल असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा मध्यस्थी देखरेख समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. जे. भारूका यांनी सांगितले कुडाळ येथे आयोजित केलेल्या मेडिएशन ट्रेनिंग प्रोग्रामच्या कार्यक्रमा वेळी ते बोलत होते.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच महाराष्ट्र लीगल अॅथोरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेल येथे वकिलांसाठी ५ दिवसाचे मेडिएशन ट्रेनिंग प्रोग्रॅम होणार आहे या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्ह्याचे प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा मध्यस्थी देखरेख समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. जे. भारूका यांच्या हस्ते झाले. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे सदस्य जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य सिंधुदुर्ग आणि गोव्याचे पालक सदस्य तथा बार कौन्सिलचे क्लेप कमिटी उपाध्यक्ष वकील संग्राम देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील राजेंद्र रावराणे, कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील निखिल गावडे तसेच कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. बाचुलकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटकर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त प्रशिक्षण देणारे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. ए. नांदगावकर, एम. के. जाधव, दिल्ली उच्च न्यायालयातील जेष्ठ वकील पोपट तसेच मेडिएशन ट्रेनर वकील विलास पांगम, वकील अजित भणगे, वकील राजीव बिले यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा मध्यस्थी देखरेख समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. जे. भारूका यांनी सांगितले की, मध्यस्थी या प्रशिक्षणाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवश्यकता होती अनेक खटले मध्यस्थीच्या माध्यमातून निकाली होऊ शकतात त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य वकील संग्राम देसाई यांनी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला हा कौतुकास्पद आहे त्यामुळे २५ वकिलांना मध्यस्थी संदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आता या मध्यस्थी करणाऱ्या वकील वर्गातील मंडळींना समजणार की न्यायाधीशाच्या वेदना काय असतात. लोकांना न्याय देताना किती सहनशीलता बाळगावी लागते किती संयम पाळावा लागतो हे आता समजणार आहे. असे त्यांनी सांगितले.
तर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य वकील संग्राम देसाई यांनी सांगितले की मेडिएशन ट्रेनिंग प्रोग्रॅम हा फक्त एका जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच देण्यात आला आहे सामान्य माणसांना कायद्याची माहिती झाली पाहिजे तसेच त्याला न्याय देताना कुठेही आपल्याकडून अन्याय होऊ नये हे बघितले गेले पाहिजे वादी प्रतिवादी यांच्यामध्ये वाढ मिटवण्याची जी भूमिका निभवली पाहिजे ती या प्रशिक्षणामध्ये समजणार आहे सगळ्यात मध्येच त्याची भूमिका महत्त्वाची असते असे त्यांनी यावेळी सांगितले.
