✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने झाराप येथील श्री देवी भावई मंदिरात जत्रोत्सवानिमित्ताने मंदिर स्वच्छता अभियान नुकतेच राबविण्यात आले.

झाराप येथील श्री देवी भावई देवीचा वार्षिक जत्रौत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जत्रोत्सवानंतर मंदिर परिसरात मांडलेली विविध दुकाने यामुळे काही प्रमाणात अस्वच्छता होत असते. या अनुषंगाने सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने मंदिर परिसरात सर्व कचरा उचलून मंदिर परिसर पुर्णत: स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच धर्मप्रेमी नरेंद्र बिड्ये, विठ्ठल यशवंत गावकर, श्रीम. रेवती सावंत, सनातन संस्थेचे सदाशिव घाग, व ईतर धर्मप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेतला. संस्थेच्या या उपक्रमाबाबत स्थानिकांनी कौतुक करत संस्थेचा हा उपक्रम खूपच छान असल्याचे सांगितले. सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याला अनेकांकडून चांगले सहकार्य करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page