लोकसंवाद /- कुडाळ.
मुंबई – गोवा महामार्गावरील कुडाळ येथे जखमी अवस्थेत असणाऱ्या इसमाचे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान निधन झाले हा इसम सातारा येथील असल्याचे समजते तरी याबाबत माहिती मिळाल्यास कुडाळ पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन कुडाळ पोलिसांनी पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.
मुंबई- गोवा महामार्गावर मंगेश सोपान पाथरणी (वय- ४८) हा जखमी अवस्थेत २८ ऑक्टोबर रोजी आढळून आला त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले या इसमाला डॉक्टरांनी विचारणा केली असता सातारा हिंदवाडी येथे आपण राहत असल्याचे सांगितले होते त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी त्याचे उपचारादरम्यान निधन झाले मात्र सातारा येथे हिंदवाडी गाव नसल्याचे आढळून आले आहे तरी या इसमा बाबत माहिती मिळाली तर कुडाळ पोलीस ठाणे (०२३६२-२२२५३३) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.
