कुडाळ /-

कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर दोघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार आज रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच घडला. दरम्यान, हल्ला करणारे संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जखमी पटेल यांना कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भाजपच्या संध्या तेरसे, आनंद बांदिवडेकर, लालू पटेल यांनी अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नेमका हल्ला कशासाठी झाला हे कारण कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page