कुडाळ /-

गेले ८ ते १० दिवस सर्व्हर प्राब्लेम सुरु असुन E – POS मशीन चालत नसून सर्वर एरर सुरु आहे त्यामुळे ग्रामस्थांचे थंब लागत नाहीत व थंब लागल्याशिवाय धान्य वितरीत करता येत नाही. सध्या भात कापणी सुरु असुन शेतकऱ्यांना तासन तास धान्य दुकानावर धान्य घेण्यासाठी थांबावे लागत आहे. जेष्ठ नागरीक, शेतकरी ग्रामस्थ तसेच इतर ठिकाणी बाहेरगावी कामासाठी जाणारे ग्रामस्थ हे सकाळी ७ वाजलेपासून धान्य दुकानावर येऊन थांबून राहतात त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे शेतकरी ग्रामस्थ हे धान्य दुकान कर्मचारी यांच्याबरोबर वाद घालत आहेत, तरी सर्वर एरर मुळे गावातील बरेच ग्रामस्थांना धान्य वितरीत करावयाचे शिल्लक आहे. सर्वर एररमुळे आनंदाचा शिधा हा ऑफलाईन वितरीत करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे आनंदाचा शिधा वाटप करणेत आला.तरी आनंदाचा शिधा हा ऑफलाईन वितरीत करण्यासाठी परवानगी दिली गेली तशी सर्वर एरर प्रॉब्लेम सुरु असेपर्यंत रेग्युलर व मोफत धान्य सुध्दा ऑफलाईन वितरीत करण्यास परवानगी मिळणेस तसेच ऑक्टोबर महिन्याचे धान्य वितरीत करण्यास मुदतवाढ मिळणेस विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page