कुडाळ/-


सिंधुदुर्ग जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेबकर तर सचिवपदी कोकण नाऊचे संपादक रोहन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांच्या स्वाक्षरीने आज या नियुक्त्या करण्यात आल्या असून या नियुक्तया पुढील दोन वर्षांसाठी असणार आहेत
८३ वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा डिजिटल मिडिया परिषद ही एक शाखा आहे.राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न सोडवून या माध्यमातील पत्रकारांना संघटीत करण्याचं काम डिजिटल मिडिया करते.राज्यातील सर्व जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचा झपाट्यानं विस्तार होत आहे.


मराठी पत्रकार परिषदेचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील डिजिटल मिडिया परिषदेची स्थापना करण्यात येत आहेत.
टेंबकर आणि नाईक हे जिल्ह्यातील अन्य पदाधिका-यांच्या नियुक्तया करतील.श्री टेंबकर हे गेली 18 वर्षे पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी यापुर्वी तरूण भारत मध्ये काॅलेज प्रतिनिधी व त्यानंतर रत्नागिरी टाईम्स,पुढारी व सकाळ या दैनिकात काम केले आहे त्यानंतर त्यांनी ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून डिजीटल मिडीयाचा प्रवास सुरू केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page