सिंधुदुर्ग /-
सात – बारा वरील तक्रारदाराच्या शेत जमिनीवर कुळ म्हणून नाव नोंद करण्याबाबतच्या तहसीलदार देवगड यांच्या आदेशा नुसार नोंद करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली त्यातील 3हजार स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग कडून सापळा रचून दाभोळे येथील तलाठी उत्तम गंगाराम कदम (वय 45, तलाठी सजा दाभोळे) याला 3 हजाराची लाज घेताना रंगेहात पकडण्यात आले. तलाठी उत्तम कदम याने सात बारावर कुळ म्हणून नाव नोंद करण्याकरिता 5 हजार रुपयांची लाच मागणी होती. मात्र तडजोडीत ही रक्कम 3 हजार ठरली होती. याप्रकरणी संबंधित तक्रारदाराकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यानुसार सापळा रचून तलाठी उत्तम कदम याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.अपर पोलिस आयुक्त, ठाणे तथा पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे चे पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परिक्षेत्र अनिल घेरडीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.अधीक्षक दिपक कांबळे,पो. नि.शिवाजी पाटील,पो.हवा.जनार्दन रेवणकर,पो.ना.रवी पालकर,पो. शि.प्रथमेश पोतनीस यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी व्यक्तिने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
संपर्क :- लाचलुचपत प्रतिबंधक
सिंधुदूर्ग कार्यालय फोन नं. 0236 2222289
श्री कांबळे पो.उपअधीक्षक मो.नं.
9130759208
श्री.पाटीस पो.निरिक्षक मो.नं.
8369960851
श्रीम. मुल्ला पो.निरिक्षक मो.नं.
8805267878
२) टोल फ्री:- 1064, चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू असे आवाहन सिंधुदुर्ग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
