कणकवली /-
विद्युत इंजिनावर धावणाऱ्या मालगाडीच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी नांदगाव स्थानकापासून काही अंतरावर रूळावरच थांबली आहे. यामुळे जनशताब्दी नांदगाव स्थानकात तर कोच्चिवली बिकानेर एक्सप्रेस कणकवली स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे. दुसरे इंजिन पाठवून रूळावर अडकलेली मालगाडी नांदगाव स्थानकात आणण्यासाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.कोकण रेल्वे मार्गावर मालगाड्या इलेक्ट्रीक इंजिनावर धावत आहेत.यात कणकवली ते नांदगाव या स्थानकादरम्यान एका मालगाडीच्या इंजिनावरील पेन्टाग्राफ वीज वाहिन्यांशी जोडला जात नसल्याने मालगाडी जागेवर थांबून आहे.त्याच्याच परिणाम म्हणून जनशताब्दी एक्सप्रेस नांदगाव येथे थांबविण्यात आली आहे.मालगाडीचा हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुसरे मशीन पाठवले असून मालगाडी लगेचच मार्गस्थ होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
