कुडाळ /-
जिल्ह्यात आणि कोकणामध्ये जेई आणि नीट या परीक्षांसाठी आघाडीवर असलेली परफेक्ट अकॅडमी नेहमीच आपल्या रिझल्ट साठी एक कौतुकाचा विषय असते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेल्या जेईई-मेन च्या पहिल्या प्रयत्नांचे रिझल्ट आज सकाळी आठ वाजता जाहीर झाले. यामध्ये परफेक्ट अकॅडमी ने नेहमीप्रमाणे कोकणामध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत तीन विद्यार्थ्यांना 90 टक्के होऊन अधिक गुण मिळाले. यामध्ये सागर सामंत या विद्यार्थ्याने 91% गुण घेत अव्वल येण्याचा मान मिळवला.
सागर सामंत हा परफेक्ट अकॅडमी मध्ये जे ई मेन या परीक्षेची तयारी करत असून मूळचा वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचा सुपुत्र आहे. सागर सामंत सोबतच अंकित सायनी राहुल गावडे, श्रावणी कुबल, दिया कुबल या विद्यार्थ्यानी देखील दैदिप्यमान यश संपादन केले आहे. जेईई-मेन या परीक्षेमध्ये भारताभरातील वीस लाख विद्यार्थी सहभागी होतात. याचा प्रथम प्रयत्न जूनच्या शेवटच्या आठवड्यात पार पडला असून किती प्रयत्न जुलै च्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. जुलै च्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या जेहीम यांच्या परीक्षेत, आत्ता उज्वल निकाल मिळालेल्या विद्यार्थ्यांसोबत किमान आठ विद्यार्थी तरी 90% च्या वरती गुण मिळवतील असा परफेक्ट अकॅडमी ला विश्वास आहे. परफेक्ट अकॅडमीच्या दैदीप्यमान देशाबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यासंदर्भात चर्चा केली असता परफेक्ट अकॅडमी चे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब म्हणाले की, परफेक्ट अकॅडमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याच्या अगोदर आपण सिंधुदुर्ग वासिय इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या निकालांबद्दल कौतुक करत असो. पण परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून मागील तीन वर्षे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घ्यावे असे दैदीप्यमान यश सिंधुदुर्गला जेईई आणि NEET परीक्षेत मिळत आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मेहनत तर आहेच पण त्याच सोबत परफेक्ट अकॅडमी चा संपूर्ण स्टाफ ही फार मेहनत आहे. परमेश्वराची कृपा आणि जनतेचा असाच पाठिंबा राहिलास येत्या पाच वर्षात सिंधुदुर्गला भारताच्या पटलावर नेण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले.
परफेक्ट अकॅडमी ची सध्या 11 वी ची बॅच साठी प्रवेश सुरू असून दुसरा बॅचमध्ये मोजक्याच जागा शिल्लक आहेत.
