जिल्हयात मनाई आदेश लागू असताना जिल्हा परिषद कशी काय घेऊ शकते कृषी प्रदर्शनतर स्वताः मनाई आदेश काढायचा व स्वताः त्याचे उल्लंघन करायचे हा न्याय काका कुडाळकर यांनी केला जिल्हा प्रशासनाला सवाल..
कुडाळ/-
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी हे प्रदर्शन योग्य वेळ विचारात न घेता तसेच घाईगडबडीत आयोजित केल्याचे सांगत विरोध दर्शवला आहे.शिवसेनेच्या या कृषी प्रदर्शनास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा “जय महाराष्ट्र”अशा शब्दांत श्री कुडाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हयात मनाई आदेश लागू असताना अशा प्रकारचे प्रदर्शन घेऊन जिल्हा परिषद लोकांसमोर नक्की कोणता संदेश देऊ इच्छिते.कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही धार्मिक,सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रम घ्यायचा असल्यास त्याला शासनाची परवानगी लागते.मात्र स्वताः मनाई आदेश काढायचा व स्वताः त्याचे उल्लंघन करायचे ही बाब देखील गंभीर आहे.त्यामुळे हा शासकीय कार्यक्रम कसा काय आयोजित करण्यात आला आहे?असा सवाल काका कुडाळकर यांनी केला आहे.
कणकवली तालुक्यातील हरकुळ येथील काही शेतकऱ्यांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली असता,जिल्ह्यात वातारण अतिउष्ण असून त्यामुळे एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.असे कारण देऊन ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे.मात्र याच अतिउष्ण वातावरणा मध्ये जनावरांच्या विविध स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करायला प्रशासन परवानगी कोणत्या आधारावर देणे हा देखील एक प्रश्न सर्वसामान्यांनासमोर आहे.वास्तविक पाहता हे शासन महाविकास आघाडीचे आहे.त्यामुळे घटक पक्षांनाही जिल्हा परिषद प्रशासनाने विश्वासात घेतले पाहिजे होते.फक्त शिवसेना पदाधिकारी ठरवितात.तेच होणार ही प्रशासनाची भुमिका राहिली. आता राष्ट्रवादीला योग्य त्या पध्दतीने प्रशासनाला जाब विचारावा लागणार आहे.निव्वळ शासनाचा पैसा खर्च करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम करणं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक आहे.असेही श्री कुडाळकर यांनी म्हटले आहे.
ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधणार याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे लवकरच लक्ष वेधणार असल्याचेही दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात काका कुडाळकर यांनी म्हटले आहे.
