सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 55 हजार 854 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 1 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.मागील 24 तासातील 0 मृत्यू आहे.तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे.सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
