कुडाळ /-
कवठी गावात गेल्या वादळापासुन लाईट नाही ग्रामस्थांचा झाला उद्रेक थेट कुडाळ विज कार्यालय गाठून सरपंच श्री रुपेश वाड्येकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केले पाचारण आमदार नाईक येताच विज मंडळ अधिकारी यांना २० लोखंडी पोल देण्याच्या सुचना आत्ता पासुनच लाईटचे काम सुरण्याचे आदेश..
दीले
कवठी गाव अगदी डोंगरकपाडीत असलेले गाव गेले बारा दीवस ग्रामस्थ पाणी आणि लाईट पासुन वंचित होते आज तर उद्रेक झाला अखेर शिवसेनेचे अतुल बंगे, रुपेश पावसकर सरपंच रुपेश वाड्येकर, कवठी युवक मंडळ अध्यक्ष संजय करलकर शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकरयांच्या सह किमान पंचविसकरण्याचग्रामस्थांनी कुडाळ विज कार्यालय गाठून वालावल विभागाचे शाखा अभियंता सोनवणे यांना धारेवर धरत पोल ची मागणी लावुन धरली शेवटी आम्हाला पोल दील्या शिवाय एकही पोल अन्य गावात जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला असता सरपंच रुपेश वाड्येकर यांनी आमदार वैभव नाईक यांना फोन करुन बोलवुन घेत वस्तुस्थिती सांगितली अखेर आम नाईक यांनी कवठी गावासाठी लागलीच सतरा लोखंडी पोल देऊन विज सुरू करण्याचे आदेश दीले यावेळी आमदार वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी कवठी उपसरपंच भरत मेस्त्री, संतोष सांगळे, दीपक सांगळे, गौरेश वाड्येकर, दादा करलकर, दिनेश गोरे,व इतर ग्रामस्थ होते.