सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यासाठी १२ अध्ययावत रुग्णवाहिका मिळणार असल्याचे मान्य केले आहे. सदर रुग्णवाहिका या आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत, पालकमंत्री उदयजी सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपकजी केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या मागणी नुसार राज्य शासनाने आपल्या खनिकर्म विभागाच्या निधी मधून विशेष बाब म्हणून मंजूर केल्या आहेत.
याबाबत जी प च्या स्थायी समिती सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जी. प. सदस्य संजय पडते यांनी सदर रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल पालकमंत्री उदय सामंत यांचा अभिनंदन ठराव घेतला होता. परंतु समर्थक असलेल्या रणजित देसाई यांनी शिवसेनेस श्रेय मिळेल म्हणून त्यास आक्षेप घेतला होता. मुळात जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे इतक्या रुग्णवाहिका खरेदी करण्या एव्हढे बजेट सुद्धा नाही आहे. जिल्ह्यासाठी महा विकास आघाडीच्या माध्यमातून चांगले काम होत असताना आपल्या नेहमीच्या सवई प्रमाणे अपशकुन करण्याचा प्रयत्न त्यावेळी सुद्धा केला गेला होता.

परंतु जी. प. अध्यक्षांच्या पत्रकार परिषदेमुळे समस्त जिल्हा वासीयांचा आरोग्य सेवेच्या बाबत महा विकास आघाडी शासनाचे सर्व पदाधिकारी किती जागृत व तत्पर आहेत याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येणाऱ्या काळात आरोग्य सेवेच्या बाबतीत जिल्हा पूर्णतः सुसज्ज करण्या करता आघाडी शासन वचन बद्ध आहे. सध्या कोविड काळात ऑक्सिजन बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी ऑक्सिजन प्लांट सुद्धा उभारले जात आहेत. कोविड ची दुसरी लाट राज्यात असूनही महा विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामांना सुद्धा प्राधान्य देण्यात येत आहे. भविष्यात आरोग्य विषयक संकटांना जिल्हा सक्षम पणे सामोरे जाईल हे ही या निमित्ताने नमूद करावेसे वाटते!पालकमंत्री उदयजी सामंत यांनी या जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या 12 रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिल्या बद्दल पुन्हा एकदा जि प अध्यक्ष यांचे अभिनंदन !!!असे प्रतिपादन जि. प.सदस्य तथा शिवसेना गटनेते श्री.नागेंद्र परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page