वेंगुर्ला /-


सागरतीर्थ ग्रामपंचायत अंतर्गत कुडववाडी, फटनाईकवाडी व टाक येथे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची वाढती संख्या पाहता ‘कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करणेसाठी’ वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी ग्राम नियंत्रण समिती सोबत भेट देऊन पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी उपसरपंच सुषमा गोडकर,ग्रामसेवक तारी,ग्रा.पं सदस्या समृद्धी कुडव,तलाठी कदम,पोलिस पाटील मेस्त्री , आरोग्य विभागाचे आर. बी. पवार, आरोग्यसेविका सुश्मिता साळगावकर,आरोग्य सेवक कळंगुटकर,सुपरवायझर रेडी, पोलिस हवालदार योगेश वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
तालुक्यातील कंटेंटमेंट झोन मधील काही नागरिक तसेच कोरोना टेस्ट करणेसाठी स्वॅब दिल्यानंतर रिपोर्ट येण्या अगोदरच काही नागरिक घराबाहेर पडत असल्याच्या ग्रामनियंत्रण समिती च्या तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा नागरिकांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे प्रशासन मार्फत सांगण्यात आले. कंटेंटमेंट झोन मध्ये पोलिस व ग्रामनियंत्रण समिती संयुक्तपणे गस्त घालणार असल्याचे ही सांगितले.
वेंगुर्ले तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची वाढती संख्या पाहता याबाबत तालुका प्रशासनामार्फत नागरिकांनी याचे गांभीर्य ओळखून नियम पाळणे बाबत आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page