कुडाळ /-

नवीन रेशन कार्ड मिळाली त्यांना धान्य का मिळत नाही? असा सवाल करीत प्रत्येक रेशनकार्डधारकांना धान्य मिळालेच पाहिजे अशी मागणी आज शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यानी तहसीलदार अमोल पाठक यांची भेट घेऊन केली.प्रत्येक रेशन कार्ड धारकाला रास्त दराच्या धान्य दुकानावर धान्य मिळाले पाहिजे कोणीही यापासून वंचित राहता कामा नये अलीकडे सातत्याने पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड धारक नावनोंदणी इतर बाबतीत बदल होत असल्याने कार्डधारकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते थम्बबाबत बऱ्याच दुकानावर थम्ब न लागल्याने कार्डधारकांना ताटकळत राहावे लागते आदी विविध समस्यांबाबत आज गुरुवारी 29 एप्रिल रोजी श्री बंगे व शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली.

श्री बंगे म्हणाले रेशनकार्ड वरील नावे कमी करणे व नावे समाविष्ट करणे ही कामे पूर्वीप्रमाणे तलाठी यांच्या कडेच देण्यात यावी कारण ग्रामीण भागातील या लोकांना हेलपाटे मारावे लागतात छोट्या छोट्या कामांसाठी त्यांना गावपातळीवरच न्याय मिळावा छोट्या छोट्या कामांसाठी लोकांची परवड होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी.

20 टक्के राजकारण व 80 टक्के समाज कारण हे शिवसेनेचे ब्रीद आहे या पध्दतीने असंख्य शिवसैनिक समाजात कार्यरत आहेत कुडाळ तालुक्यातील गोरगरीबांच्या कोणत्याही कामाला आडकाठी येता कामा नये यासाठी खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आम्हाला या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळत आहे ग्रामीण भागातील लोकांना छोट्या छोट्या कामांना हेलपाटे मारावे लागतात ती कामे ग्रामीण भागातील लोकांची व्हायला पाहिजे हीच आमची अपेक्षा असल्याचे बंगे यांनी तहसीलदार यांनां सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page