सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्ड आणि को वॅक्सिन चे आतापर्यंत (२५ एप्रिल) एकूण १ लाख २९० डोस प्राप्त झाले असून या पैकी ९९ हजार ३७६ जणांना लस देण्यात आली आहे. लस वेस्टेज ( वाया) जाण्याचे प्रमाण ०.९० टक्के एवढे असून ९०४ एवढे डोस वेस्टेज झाले आहेत. ८२९४५ जणांनी पहिला तर १६४३१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आता कोविशिल्डचे १० डोस शिल्लक असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय नांद्रेकर यांनी दिली.         सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्या पासून आतापर्यंत (२५ एप्रिल) जिल्ह्यात लसीचे १ लाख २९० एवढे डोस उपलब्ध झाले होते. यात कोवीशिल्डचे ७४३८० तर को वॅक्सिन चे २५९१० डोस उपलब्ध झाले आहेत. यातील कोविशिल्डचे ७४३७६ तर को वॅक्सिन चे २५००० डोस असे एकूण ९९ हजार ३७६ जणांना लस देण्यात आली आहे.  यात ८२ हजार ९४५ जणांना पहिला तर १६ हजार ४३१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यात १५ हजार २९२ आरोग्य कर्मचारी, ८ हजार ५२८ फ्रंट लाईन वर्कर्स, ४५ ते ६० वयोगटातील २६ हजार ९१६ जणांना तर ६० वर्षांवरील ४८ हजार ६४० जणांचा समावेश आहे. तर २५ एप्रिल सायंकाळ पर्यंत आरोग्य यंत्रणेकडे केवळ १० डोस शिल्लक राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page