बांदा /-

गोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची दर पंधरा दिवसांनी रॅपिड टेस्ट करण्यात यावी, रोज टेस्ट न करता त्यांचे फक्त तापमान तपासण्याची यावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज येथे आरोग्य विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यातून एकूण 14 हजार तरुण तरूणी गोव्यात नोकरीसाठी जात आहेत असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आज सौ. सावंत यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व अधिकारी व प्रशासनाशी चर्चा केली यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत येथील लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी औषसाठ्याची माहिती घेतली. बांदा आरोग्य केंद्रात सर्वाधिक ओपीडी असल्याने अतिरिक्त कर्मचारी देण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले. यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती शर्वाणी गावकर, सभापती निकिता सावंत,महेद्र चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, गटविकास अधिकारी व्ही एन नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश पाटील, डॉ मयुरेश पटवर्धन, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page