सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान जिल्ह्यात आज ७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून आणखी २८४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत, अशी असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

मृतांमध्ये अंबडपाल, मुळदे-कुडाळ येथील ६३ वर्षीय महिला आहे.तिला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कनकनगर-कणकवली येथील ८५ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. न्हावेली सावंतवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. नांदगांव- कणकवली येथील ८० वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. मेढा-मालवण येथील ७४ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. भिकेकोनाळ-दोडामार्ग येथील ६० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कुणकवने- देवगड येथील ६१ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page