आचरा पारवाडी प्रकल्प विरोधी समितीच्या बैठकीत घेतला निर्णय..

आचरा /-

आचरा पारवाडी हद्दीत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे आचरा पारवाडी, डोंगरेवाडीच्या वस्तीला मोठा फटका बसत असून शेती, विहिरीचे पाणी दुषित होत असल्याने प्रकल्प बंद करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी करूनही शासनाकडून आजपर्यंत प्रकल्प बंदबाबत कोणताही कार्यवाही न झाल्याने आचरा पारवाडी, डोंगरेवाडी ग्रामस्थांनी येत्या दहा दिवसांत प्रकल्पांबाबत ठोस निर्णय न झाल्यास
ग्रामस्थ आपली घरेदारे, शेती विहिरी वाचवण्यासाठी जन आंदोलनाचा मार्ग पत्करणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे आचरा पारवाडी, डोंगरेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

पारवाडी हद्दीत चालू असलेल्या कोळंबीप्रकल्पामुळे पारवाडी, डोंगरेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीत खारे पाणी शिरून शेतजमिनी व वाडीतली पिण्याच्या पाण्याच्या विहिरी दुषित झाल्या आहेत. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभेत आवाज उठवत प्रकल्प बंद करण्याचा एकमुखी ठराव घेतला होता. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांची भेट घेत प्रकल्प बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले होते आमदार वैभव नाईक यांनी आचरा सरपंच प्रणया टेमकर व ग्रामस्थ यांच्यासमवेत तिल्हाधिकारी यांची ८ एप्रिलला भेट घेतली होती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत आमच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली होती. आपणाकडून आम्हा ग्रामस्थांना आठ दिवसात पाहणी करून प्रकल्पाच्या परीणामाची माहिती घेवू असे आश्वस्थ केले होते मात्र आजपर्यंत या प्रकल्प संदर्भात कोणतीही पाहणी झालेली नाही. दिवसागणीक आचरा पारवाडी डोंगरेवाडीतील पिण्याचे पाणी दुषित होत असून समस्या गंभीर होत चालली आहे. सदर कोळंबी प्रकल्पात पाणी साठावणे चालूच आहे. पावसाळयाचा हंगाम काही दिवसावर असून प्रकल्प बंद न झाल्यास गतवर्षी प्रमाणे पारवाडीला पुराचा सामना करावा लागणार आहे. आपले लक्ष वेधूनही हा प्रकल्प बंद व्हावा यासाठी कोणतेही ठोस पाहूल उचलले गेलेले दिसत नाही. आमच्या या निवेदनाचा आपण साहनभुतीपुर्वक विचार करून येत्या १० दिवसात योग्य तो निर्णय घेवून प्रकल्प बंद करण्याची कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही ग्रामस्थ आमची घरेदारे, शेती वाचवण्यासाठी न्याय सनदशीर मार्गाने जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे ग्रामस्थांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page