कणकवली /-

सरकारला इशारा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर आजचा एकदिवसीय संप सुरू
ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अनेक वर्षापासून वेतनाचा व इतर प्रश्न प्रलंबीत आहेत या साठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ यांनी दि. १५/०३/२०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्री यांना निवेदन देऊन प्रलंबीत मागण्यांवर ३१ मार्च पर्यंत निर्णय न घेतल्यास दि. १९एप्रिल पासून राज्यभर कामबंद आंदोलन व आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. परंतु आता शासनाने राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे अशा वेळी शासनास सहकार्य करणे महत्वाचे असल्याने युनियन ने बेमुदत कामबंद आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करून आज एकदिवसीय कामबंद आंदोलन करून शासनाला इशारा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी आज आपली दैनंदिन पाणी पुरवठा, सफाई, कार्यालयीन कामकाज बंद ठेऊन या एकदिवसीय कामबंद संपात सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही आजपासू बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार व गावातील लोकांना होणार त्रास या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही या आज शासनाला सहकार्य करून एकदिवसीय आंदोलन करून शासनाला इशारा देतो की या पुढील कालावधीत शासनाने आमच्या प्रलंबीत मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास यापुढे गावातील पाणी पुरवठा, साफसफाई,करवसूली, कार्यालयीन कामकाज बंद करून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत असे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अभय सावंत यांनी सांगितले आहे. आपल्या या कामबंद आंदोलनास सरपंच, ग्रामसेवक व जिल्हा प्रशासन तसेच गावातील ग्रामस्थ यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page