कुडाळ /-

“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अखिल मानव जातीच्या सर्वांगिण सुधारणेचे भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्य ,समता, बंधुता आणि न्याय याचे कैवारी होते. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे अशी भूमिका घेऊन आयुष्यभर देश व देश बांधवांच्या हिताचा विचार करणारे सच्चे देशभक्त होते.”असे उद्गार प्रा. अरुण मर्गज यांनी काढले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना च्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव होते की शिक्षण आणि समाजाबाबत त्यांचा दृष्टिकोन फार दूरदर्शी होता. शिक्षणाचा व्यवहारात उपयोग होणे हे खरे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट असले पाहिजे असं समजून भारतासारखा कृषिप्रधान देश विकसित होण्यासाठी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यातून बेरोजगारांना, शेतमजुरांना रोजगार मिळेल. ग्रामीण भाग विकसित होईल, देशाची आर्थिक बाजू भक्कम होईल .असा विचार व्यक्त करणारे थोर तत्त्वज्ञ व अर्थतज्ज्ञ होते. देशाचा विकासाचा मार्ग सामाजिक व आर्थिक सबलतेतून जातो. अशी श्रध्दा असलेले द्रष्टे लोकसेवक होते. अशा या महामानवाचे विचार आत्मसात करून त्यांना अभिप्रेत कार्य आपण केले तर ती त्यांना खरी श्रद्धांजली होऊ शकते. असे सांगत त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, आठवणी सांगत त्यांच्या विचारांचा उपस्थितांना परिचय करून दिला. व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाला बी.एड. महाविद्यालयाचे प्रा .परेश धावडे,एच .आर.ओ. पियुषा प्रभूतेंडोलकर, बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलचे प्रसाद कानडे, मधुरा ईनसुलकर , नर्सिंग महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राचार्य,सौ.कल्पना भंडारी, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राध्यापक सोशलडिस्टन्स चे नियम पाळून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page