आचरा /-

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून शुक्रवारी रात्री आठ पासून विकेंड लाॅकडाउन जाहीर करण्यात आले आहे.या पार्श्र्वभूमीवर आचरा येथील मेडिकल स्टोअर्स वगळता इतर सर्व आस्थापनेवरील बंद ठेवत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.त्यामुळे इतर वेळी गजबजलेली आचरा बाजारपेठेत पुर्णतः शुकशुकाट पसरला होता.
मालवण तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून आचरा बाजारपेठ ओळखली जाते. याच बरोबर बॅंका पतसंस्था, विद्युत कार्यालय मुळे खरेदी सह इतर कार्यालयीन कामकाजासाठी या भागात नेहमी वर्दळ असते.पण विकेंड लाॅकडाउनला व्यापारी, नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने नेहमी गजबजलेल्या ठिकाणी आज शुकशुकाट पसरला होता. विकेंड लाॅकडाउनच्या पार्श्र्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आचरा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा तिठा येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फोटो–
१) बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता.
२) पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page