वेंगुर्ला / –
वेंगुर्ला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढत असून आज शुक्रवारी उशिरा आलेल्या अहवालात नव्याने ७ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये आरवली ३,
न्हैचिआड १,
वेंगुर्ले वडखोल १,वेंगुर्ले रामघाट रोड १ व दाभोली १ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत. गुरुवारी आलेल्या अहवालात नव्याने ५ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात १ ,नवाबाग १, जोसोली १,वेतोरे पालकरवाडी १, कोचरा १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.तालुक्यात शहर तसेच ग्रामीण भागात प्रतिदिन कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संख्येत वाढच होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page