आचरा /-

आचरा शेतमाळावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग शेतमाळावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत आंबा कलमबागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन आंब्याच्या हंगामात धरलेली आंब्याची कलमे आगीत जळून गेल्याने शेतकऱ्यांची हानी झाली आहे. लागल्याचे समजताच आचरा देउळवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला यामुळे काही बागा वाचवण्यात यश आले.

रविवारी दुपारच्या सुमारास आचरा शेतमाळावर अचानकपणे आग लागली. विलास घाडी ,चंद्रकांत घाडी त्यांची धरती आंबा कलमे, अरविंद सावंत यांची लहान आंबाकलमे जाळून गेली, यात घाडी कुटुंबाची धरलेली आंबा कलमे जाळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात बांबूची बेटेही आगीत जळून खाक झालीत. जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या सुक्या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग आचरा शेतमाळावर पसरत चालली होती. आचरा येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी जीव धोक्यात घालून मिळेल त्याने आग विझवत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशांत घाडी, परेश सावंत, उदय बापर्डेकर, अक्षय घाडी, आकाश घाडी, अजय घाडी, संकेत घाडी,भाऊ घाडी,नितीन घाडी, धोंडू घाडी, सुधीर घाडी ,चंद्रकांत घाडी, चन्द्रसुहास घाडी, उदय घाडी, रवींद्र घाडी यांनी भर दुपारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू असताना संपदा आचरेकर, तन्वी आचरेकर ,दिशा आचरेकर यामुलींनी बोअरिंगचे पाणी कळशांनी आणून देत आग विझवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. पाण्याचा मारा सुरू करत आगीवर ताबा मिळवत इतर बागांचे होणारे नुकसान त्यामुळे टळले.

फोटो
आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page