विकेल ते पिकेल अभियानांतर्गत रामगड येथे शेतमाल विक्री केंद्रांचा शुभारंभ..

मालवण /-

विकेल ते पिकेल अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेला शेतमाल विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः विक्री करण्याचा उपक्रम राबविला जातोय.त्यामुळे शेतमालाची विक्री करताना मध्यस्थी, दलाल कमी होऊन थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रामगडच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या विक्री केंद्रांप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करून आर्थिक उन्नती साधावी त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीने आज रामगड येथील श्री.सखाराम काशिराम घाडीगांवकर व श्रीम.कोमल कृष्णा जिकमडे यांच्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रांचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला.
यावेळी मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकेल ते पिकेल अभियानाची संकल्पना याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी कृषी विभाग राबवित असलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख दीपक राऊत, रामगड सरपंच विलास घाडीगांवकर उपसरपंच अमित फोंडके,असगणी सरपंच हेमंत पारकर,सुभाष धुरी, शामसुंदर घाडीगांवकर, सुरेंद्र जिकमडे,संदिप जिकमडे ,पोलिस पाटील नारायण जिकमडे, त्रिंबक कृषि सहाय्यक एस.डी.शिंदे, आडवली कृषि सहाय्यक ए.डी.कुरकुटे, रामगड कृषि सहाय्यक ए.आर.धुरी,आत्मा व्यवस्थापक निलेश गोसावी तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. रामगड कृषिपर्यवेक्षक ए.ई.शेख यांनी यावेळी प्रास्ताविक व स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page