कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट|च|र सुरू आहे.दर वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीच्या नावाखाली आपल्या मर्जीतील ठेकेदाराला ठेका देऊन पाच ते सहा लाखाची एका शाळेची दुरुस्ती केली जाते.मात्र ही दुरुस्ती ज्या ठिकाणी हवी त्या ठिकाणी न करता ती ठेकेदाराला जिथे वाटेल त्या ठिकाणी ही दुरुस्ती केली जाते.या कारणास्तव जिल्हा परिषदेचा कोट्यवधी निधी हा अस्वास्थव खर्च केला जातो.तेच वाशे तेच छप्पर दाखवून फक्त रंग-रंगोटी केली जात आहे.याच कारणास्तव आपण आयुक्तांकडे याची तक्रार करणार असल्याचे संजय पडते,नागेंद्र परब ,अमरसेंन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

एका रात्रीत तीन पक्ष बदलणाऱ्यानी शिवसेनेला शिकऊ नयेत,भाजपचे पदाधिकारी हे भाजपला जुमानत नसल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष हे सैरभय झालेले दिसत आहेत.म्हणूनच ते बिनबुचडे आरोप शिवसेनेवर करताना दिसतात.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे भाजपचे सदस्य हे नाराज असल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी त्यांना एस. एस. पी.एम. हॉस्पिटलमध्ये बंद खोलीत डांबून ठेवले गेले.आता जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीच्या वेळी ते तुम्हला दिलसे.असे आज शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात जिल्हा परिषदेचे गट नेते नागेंद्र परब ,उपजिल्हाप्रमुख अमरसेंन सावंत यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे ,शहर प्रमुख संतोष शिरसाट, राजू गवंडे ,नितीन सावंत, गोट्या चव्हाण,बंड्या कोरगावकर,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page