मसुरे /;

ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ‘डेमो हाऊस’ चा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पळसंब ग्रामपंचायत येथे करण्यात आला.तालुकास्तरावर एकमेव असे हे डेमो हाऊस असणार आहे. आवास योजनेतील घर बांधणी कशी असावे याबाबत लाभार्थ्यांना माहिती मिळावी या हेतूने या डेमो हाऊसची उभारणी करण्यात आली आहे.

यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी संजय गोसावी, विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव, के.टी. पाताडे, सुरज बांगर, पंचायत समिती सदस्य अशोक बागवे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, सदस्य एकनाथ चिंचवलकर, प्रणिता पुजारे, सिमा चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष तर्फे, हडी सरपंच महेश मांजरेकर, आडवली सरपंच संजय आडवलकर, त्रिंबक ग्रामसेविका सुरेखा सूर्यवंशी यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

*सरपंचांचे काम आदर्शवत*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदभार स्विकारल्या नंतर आज मालवण तालुक्यात काही ग्रामपंचायतींना भेटी देण्यात आल्या. यात प्रामुख्याने हडी ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध योजना पाहता येथील सरपंचांचे काम आदर्शवत असेच आहे. अधिकारी वर्गापेक्षा जास्त माहिती येथील सरपंचांना आहे. अनुभवही जास्त आहे. ग्राम विकासाच्या दृष्टीने खरोखरच ही चांगली बाब असल्याचे सांगत हडी, पळसंब आदी ग्रामपंचायतींच्या कामाचे सीईओ प्रजित नायर यांनी विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page