वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने 60 वर्षावरील व्यक्ती व 45 वर्षा वरील मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना कोविड -19 लसीकरण तत्काळ करा , तालुक्यातील जनतेसाठी 5 हजार लस साठा जिल्हा आरोग्य विभागाकडे मागणी करून घ्यावी, लवकरच वैभववाडी तालुका 100% लसीकरण करुन घ्या अशा सूचना आ. नितेश राणे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे आ.नितेश राणे यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी वैभववाडी तालुका भाजप तालुका अध्यक्ष नासिर काझी ,माजी सभापती जयेंद्र रावराणे, पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे,उपनगराध्यक्ष रोहन रावराणे,जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण,राजेंद्र रावराणे, माजी जी.प.सभापती स्नेहलता चोरगे,प्राची तावडे भारती रावराणे, सीमा नानिवडेकर,हर्षदा हरयान,शुभांगी पवार,डॉक्टर सोनवणे, डॉक्टर धर्मे व अन्य आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
आ.नितेश राणे म्हणाले,वैभववाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा देताना रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा ताण पाडतो.यासाठी आपण वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी आपण बोललो आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातील फार्मासिस्ट ,आरोग्य सेविका, सफाई कामगार अशी अनेक पदे रिक्त आहेत .ही पदे तत्काळ भरण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला.या वेळी आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदार फंडातून रुग्णवाहिका दिली.या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो:वैभववाडी ग्रामीण रुग्णालयसाठी रुग्णवाहिका लोकार्पण करतांना जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण ,आ.नितेश राणे व अन्य मान्यवर.छाया:(मोहन पडवळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page