वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील कोचरे गावात बीएसएनएल टॉवर होण्यासाठी सरपंच साची विकास फणसेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून टॉवरचे काम पूर्ण होऊन तो लवकरच सुरू होणार असल्याने कोचरे वासियांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
हा बीएसएनएल टॉवर सुरू होण्यासाठी सरपंच यांनी वारंवार पाठपुरावा करून हा बीएसएनएल टॉवर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार बीएसएनएल प्रशासनाने हा टॉवर २८ फेब्रुवारी पर्यंत कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार या टॉवरचे काम पूर्ण झाले. मात्र विद्युत कनेक्शन साठी मोठया निधीची गरज होती, तेवढा निधी बीएसएनएल कडे नसल्याने टॉवर कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत होता. दरम्यान यासाठी तात्काळ सरपंच यांनी खासदार, पालकमंत्री, आमदार यांचे लक्ष वेधले. यावेळी तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार तात्काळ कार्यवाही करून जिल्हा नियोजन मधून यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे आता टॉवर कार्यान्वित होण्याचा मार्ग खुला होणार आहे,अशी माहिती सरपंच साची फणसेकर यांनी दिली आहे. यावेळी पुढे बोलताना साची फणसेकर म्हणाले की, कोचरे गावाला विकासासाठी खासदार, पालकमंत्री, आमदार यांनी भरघोस निधी देऊन नेहमीच झुकते माप दिले आहे. असे सांगत सरपंच यांनी खासदार पालकमंत्री, आमदार यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page