आचरा तिठा ते बाजारपेठ काढण्यात आली जनजागृती फेरी

आचरा /-

विद्युत मंडळाकडून वीजबिल थकबाकीदारांनी वीज बिल भरण्यासाठी जागृती केली जात आहे.सोमवारी सकाळी आचरा उपविभाग अंतर्गत आचरा तिठा ते बाजारपेठ दरम्याने फेरी काढून विद्युत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या फेरीचा शुभारंभ आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते केला गेला. या वेळी त्यांच्या सोबत जिल्हापरीषद सदस्य जेराॅन फर्नांडिस, उपकार्यकारी अभियंता दिपक मुगडे,मिठबांव विभाग शाखा अभियंता मर्गज, वाहतूक पोलीस विनायक साटम, पोलीस हवालदार बाभल,अक्षय धेंडे, कांबळे,चव्हाण आदी पोलीस कर्मचारी तसेच आचरा विद्युत मंडळ कार्यालय कर्मचारी आदी उपस्थित होते. या वेळी माहिती देताना मुगडे यांनी आचरा उपविभाग अंतर्गत समाविष्ट आचरा विरण,मिठबांव रामगड या विभागातील एकूण ७११४ ग्राहकांची ३.४४कोटी वीजबिल थकबाकी आहे.महावितरण वरीष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. महावितरण ग्राहकांवर अन्याय होऊ नये याची काळजी घेत आहे.मात्र काही ग्राहख थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत असल्याने थकबाकीचा बोजा वाढत चालला आहे.अशावेळी थकबाकी दारांचा वीज पुरवठा चालू ठेवणे म्हणजे नीयमीत वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होवू शकतो.आता पर्यंत १७टक्के वसूली झाली आहे.यावसूलीसाठी सर्व कर्मचारी अधिकारी यांना गुतून रहावे लागल्यास याचा परिणाम पावसाळ्या पूर्वी होणा-या वीज वाहिन्या देखभाल दुरुस्तीवर होणार आहे तरी या बाबींचा विचार करून आपली थकबाकी ३१मार्चपुर्वी भरुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुगडे यांनी या वेळी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page