बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला मेळावा.

मसुरे /-

महिलानी परंपरा स्विकारताना विवेकाचा वापर करावा. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.सावित्रीबाईनी दिलेला वारसा जपून ठेवावा. आत्मसन्मानासाठी संघर्ष करायची तयारी ठेवावी तरच या जगात निभाव लागेल.
असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल परुळेकर यानी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे केले.
प्रारंभी सुजाता पावसकर यानी आपल्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त आयोजित विविध स्पर्धांची माहिती दिली.सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यानी आपली उक्ती आणि कृती एकच असावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे सांगून सेवांगणच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
पेंडूर हायस्कूलची विद्यार्थिनी भक्ती पाटील हिने
“मी सावित्रीबाई बोलतेय”साभिनय प्रभावीपणे सादर केले. केंद्रप्रमुख आनंद धुत्रे यानी सेवांगणच्या अनेक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी सेवानिवृत्त आदर्श शिक्षका अर्चना धुत्रे यांचा
सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यशस्वीपणे शिवण वर्ग पूर्ण करणाऱ्या ३ महिलाना शिवणयंत्रे देण्यात आली त्यासाठी भाऊ मांजरेकर आणि अर्चना धुत्रे यानी अर्थ सहाय्य केले.
पाककला, चित्रकला, वेशभूषा, विविध खेळ या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भक्ती पाटील यानी केले.या कार्यक्रमास देवदत्त परुळेकर, मंगल परुळेकर, किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, अर्चना धुत्रे, आनंद धुत्रे, बापू तळावडेकर, मधुरा माडये, स्नेहा पावसकर,
श्वेता सावंत, संगम चव्हाण, प्रियांका भोगटे, शिवणवर्गाच्या विद्यार्थिनी व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page