आचरा /-
आचरा गावातील प्राथमिक शाळेच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आचरा गावात येणाऱ्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आचरा ग्रामपंचायत कडून देण्यात येणारे हे साहित्य आचरा ग्रामपंचायत सरपंच प्रणया टेमकर याच्यांहस्ते मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात आले
यावेळी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी सरपंच विद्यमान सदस्य मंगेश टेमकर,ग्रामविस्तार अधिकारी गणेश परब, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, लवू घाडी, रेश्मा कांबळी, ममता मिराशी, वृषाली आचरेकर, दिव्या आचरेकर, अनुष्का गावकर, योगेश गावकर, राजेंद्र परब, वैशाली कदम, शाळा मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, मुख्याध्यापिका स्मिता जोशी, लिपिक नरेश परब, रुपेश परब उपस्थित होते.
यावेळी सरपंच टेमकर बोलताना म्हणाल्या की आचरा गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थीला आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे त्यांच्या गुणांना वाव मिळावा त्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके, खेळाचे साहित्य मिळावे हा ग्रामपंचायतचा उद्देश आहे म्हणूनच अचऱ्यातील शाळांना हे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page