वेंगुर्ला /-

महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा – वेंगुर्ले च्या वतीने आतापर्यंत अन्याय अत्याचाराला बळी पडून हत्या झाली अशा मुलींना Candle March मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा चिटनीस ऍड. सुषमा खानोलकर म्हणाल्या की महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा विरोधात आता महिलांनी पुढे येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे. कारण महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे.तरुणींवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यामध्ये राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत.मंत्र्यांना सरकार कडून संरक्षण दिले जात आहे .पुजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपाने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला.अहमदनगरचे रेखा जरे हत्याकांड, दिशा सालीयान गुढ आत्महत्या,काँग्रेस प्रवक्ते राजु वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांचे वर बलात्काराचा आरोप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा अध्यक्ष मेहबूब शेख विरोधात बलात्काराचे आरोप, मुंबईतील एका उच्चशिक्षित महिलेने संजय राऊत यांच्या विरोधात हायकोर्टात केलेली तक्रार अशा गंभीर प्रकरणातील एकाही घटनेमध्ये ठोस कारवाई झालेली दिसत नाही.गेल्या दीड वर्षात ज्याप्रमाणे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे, ते खरोखरच दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे.कारण जेव्हा कायद्याचे रक्षकच राक्षस बनतात, सरकार मधील मंत्रीच दोषी असतात,सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच बलात्काराचे आरोपी असतात, त्यावेळी राज्यात मोगलाई आल्यासारखी वाटते,असे म्हटले.यावेळी उपस्थित महिलांनी दोन मिनिटं उभे राहून तसेच मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली .यावेळी महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले,जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर,पंचायत समिती सदस्या गौरवी मडवळ, नगरसेविका शितल आंगचेकर , साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर , कृपा मोंडकर,महिला ता. सरचिटणीस वृंदा गवंडळकर, महिला शहरअध्यक्षा प्रार्थना हळदणकर, ऋतुजा मेस्त्री, हसीना बेन मकानदार,अंकीता देसाई,संध्या गावडे, रीया केरकर, कृतिका साटेलकर , स्मिता कोयंडे , श्रद्धा गोरे , डाॅ. अफशान कौरी , सीमा नाईक तसेच तालुकास्तरावरील महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page