मालवण /-

महिला दिनाच्या निमित्ताने कुडाळ – मालवण या विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व मास्क देऊन सन्मान करण्यात आला.सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले कुटुंब, काम, कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत या महिला भगिनी एक स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात. यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने आजपासून महिला सन्मान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सन्मान सप्ताहाची सुरवात आज येथील पोलिस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांचा मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या सल्लागार अॅड. अमृता मोंडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या हस्ते शाल व गणरायाची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाने महिला पोलिस अधिकाऱ्यांनी आभार मानले.

मंडळाच्या उपाध्यक्षा नीलम करंगुटकर यांनी कोरोना प्रादुर्भाव होऊ नये ,याकरिता मास्क वाटप केले. कुडाळ मालवण या विधानसभा क्षेत्रात प्रशासनात तसेच लहान मोठे व्यवसाय उद्योजक म्हणून ज्या महिला आपल्या कार्यात सक्षमपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत.अशा महिलावर्गाचा या आठवड्यात सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी अरविंद मोंडकर, जिल्हा युवक अध्यक्ष देवानंद लुडबे, श्रीकृष्ण,तळवडेकर, नीलम करंगुटकर, सरदार ताजर, अमृत राऊळ, श्रीहरी खवणेकर,योगेश कुर्ले, श्री. मालवणकर आदी उपस्थित होते.सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन काँग्रेसच्या कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष| पल्लवी तारी यांनी केले.तर सूत्रसंचालन अरविंद मोंडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page