वेंगुर्ला /-

स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत वेंगुर्ले शहराला थ्री स्टार मानांकित कचरामुक्त शहर आणि ओडीएफ प्लसप्लस दर्जाचे हागणदारी मुक्त शहर असा दर्जा प्राप्त झाला होता.आता स्वच्छ सर्वेक्षण २०२१
ची कार्यवाही देशभरात १ मार्चपासून सुरु
झाली आहे. त्याचे मुल्यांकन करणारे केंद्रीय
पथक शहरात येणार आहे. त्यांना वेंगुर्ले
शहरातील सुजाण नागरिकांनी सकारात्मक
अहवाल देऊन वेंगुर्ले शहराला फाईव्ह स्टार
मानांकन मिळवून द्यावे आणि स्वच्छ सर्वेक्षण
२०२१ मध्ये वेंगुर्ले शहर अव्वल येण्यास
हातभार लावावा, असे आवाहन वेंगुर्ले न. प.
नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व मुख्याधिकारी डॉ.
अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.
वेंगुर्ले शहर २०१५ पासून हागणदारीमुक्त शहर म्हणून प्रमाणित आहे.वेंगुर्ले
शहरात नगरपालिकेद्वारे ओला, सुका,
प्लास्टिक, घरगुती घातक कचरा आदी
प्रकारात वर्गीकृत कचरा संकलन केला जातो. वेंगुर्ले शहरात संकलित केलेल्या संपूर्ण १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.कॅम्प येथील स्वच्छ भारत पर्यटन स्थळ
मध्ये कचरा व्यवस्थापनासाठी कांडी कोळसा
प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, गांडुळ खत प्रकल्प,
मशीन कंपोस्टिंग प्रकल्प, प्लास्टिक क्रशर
प्रकल्प, सांडपाणी व मलव्यवस्थापन प्रकल्प
आदी कार्यान्वित केले आहेत. या प्रकल्पाद्वारे
कचऱ्यापासून दर्जेदार खतनिर्मिती व माफक दरात विक्री केली जाते.

वेंगुर्ले शहरात निवासी भागात दरदिवशी १ वेळा
व वाणिज्य भागात दोनवेळा रस्तेसफाई
केली जाते. वेंगुर्ले शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यास,कचरा वर्गीकरण करुन न दिल्यास,उघड्यावर मलमुत्र विसर्जन केल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याची तरतूद नगरपालिकेने केली आहे. स्वच्छतेसंबंधी तसेच तक्रारीकरिता
१८००२३३२०९९ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page