कुडाळ /-

“कुतूहल हा विज्ञानाचा पाया आहे आणि गरज ही शोधाची जननी आहे जे सामान्यांना दिसत नाही ते शास्त्रज्ञांना दिसते व तेथूनच शोधाची सुरुवात होते त्या शोधाचा अखील जगताला फायदा होतो” असे उद्गार सरंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद बालम यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ तर्फे विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “विज्ञानवादी दृष्टीकोणच अंधश्रद्धेवर मात करू शकतो. विज्ञानातील प्रगती माणसाला अधिकाधिक सुखी जीवनाचा खजिना देऊ शकते. यासाठी बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून- रुजवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली पाहिजे. यादृष्टीने बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल चे प्रयत्न व उपक्रम स्तुत्य आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध वैज्ञानिक मॉडेल्स खरोखरच उत्तम आहेत सांगितले.यावेळी व्यासपीठावर चेअरमन उमेश गाळवणकर, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे(मुंबई विभाग) उपाध्यक्ष- श्री. गिरीश चापडे , पालक संघाचे राहुल केंकरे , श्री मंगेश साखळकर, प्रशांत वज्राटकर ,सेंट्रल स्कूलच्या उपप्राचार्य प्रियांका सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page