दोडामार्ग /-

रविवारी झालेल्या जिलेटिन स्फोट शिरंगे येथील कॉरीतच झाला असून जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना घटनास्थळा वरून सुमारे वीस किलोमीटर लांब मनेरी येथील मुख्य रस्त्यालगत फेकण्याचे दुर्दैवी कृत्य कॉरी मालकाने केले असून झालेला प्रकार उघडकीस न आणता मिटवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर येत आहे, शिरंगे येथील कॉरी ही धरणाच्या अगदी लगतच असुन महसूल विभागाने मात्र याकडे पाठ फिरवली दिसत आहे झालेला जिलेटिनचा स्फोट हा शिरंगे येथील कॉरीतच झाला असून प्रशासनावर दबाव टाकून घटनास्थळ बदलून साटेली-भेडशी येथील भोमवाडी मधील नदी पात्रात झाल्याचा बनाव करत जखमी झालेल्या परप्रांतीय मजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाअसून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार घडताना दिसत आहे तसेच झालेल्या प्रकारात कॉरी मालकावर गुन्हा दाखल करत स्फोटक पदार्थ आला कुठून याची चौकशी करणे गरजेची आहे परंतु असे नकरता प्रशासनावर दबाव टाकून जिलेटीन स्फोटात जखमी झालेल्या परप्रांतीय कामगारांवर गुन्हा दाखल करत व घटनास्थळ बदलत झालेली वास्तव घटना बाजूला टाकत प्रशासनावर दबाव टाकत बनाव करण्याचा प्रयत्न केला असून स्फोटक पदार्थ वापरण्यासाठी लागणारी परवानगी आहे की नाही तसेच स्फोट झालेला स्फोटक पदार्थ परप्रांतीय कामगारांकडे आला कसा याची देखील चौकशी केली नसून येतील कॉरीत काम करणारे परप्रांतीय मजूरांची नोंद पोलीस स्टेशन वर उपलब्ध नसून घडलेल्या प्रकारात कॉरी मालकावर जो पर्यंत गून्हा दाखल होत नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा प.स. सदस्य लक्ष्मण (बाळा) नाईक यांनी प्रेस घेत प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.
तसेच प्रशासनावर दबाव टाकून बनाव करत दाखवलेल्या घटनास्थळी गेलो असता स्फोटात जखमी झालेले परप्रांतीय कामगार येथील नदी पात्रातून मनेरी येथील मुख्य रस्त्यापर्यंत येऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी मिळालेले पुरावे बनावट असल्याचे विधान देखिल त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page