कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली.या समितीमध्ये अध्यक्ष खासदार गिरीश बापट डीजिसीआय चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे.

डीजीसीआयने अद्यापही परवानगी दिलेली नाही…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. अद्यापही या विमानतळाचा संलग्न रोड झालेला नाही. तसेच विमानतळासाठी पुरेशी विद्युत जोडणी देखील झालेले नाही. विमानतळाला पाणी पुरवठा करण्याचे काम देखील अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टी ची दुरुस्ती देखील बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला अद्यापही परवानगी दिलेली नाही.

अलायन्स एअरलाइन कंपनीचा तिकीट काउंटर सुरू

या विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअरलाइन ही कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचा तिकीट काउंटर देखील विमानतळावर सुरू झाला आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर विमानतळ सुरू करण्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण देखील रंगलेले पाहायला मिळत आहे.

समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार

दरम्यान आज जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विमानतळाची पाहणी करतानाच विमानतळ बांधकाम कंपनी आयआरबीचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. डीजिसीआय चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार आहे.यावेळी खासदार विनायक राऊत काय बोलले आपण पाहूया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page