लग्नसमारंभासाठी परवानगी घेणे बंधनकारक : सावंतवाडी तहसीलदार यांची कारवाई

सावंतवाडी/-

कोरोना च्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभासाठी पुन्हा एकदा परवानगी घेणे बंधनकारक असताना आणि तसे आदेश शासनाकडून दिले असतानाही आज सावंतवाडी तालुक्यात येथे एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या लग्न सोहळाच्या आयोजकांवर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कार्यक्रम दहा हजार रुपयांचा दंड तर मास्क न वापरणाऱ्या लोकांवर २ हजर असा एकूण १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला याला खुद्द तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दुजोरा दिला आहे. राज्यात कोरोनाचाL वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सभा व सार्वजनिक कार्यक्रमावर आडकाठी आणण्यात आले आहे लग्न समारंभ तसेच अन्य कार्यक्रमासाठी पूर्वीप्रमाणे परवानगी घेणे गरजेचे करण्यात आले आहे मात्र असे असतानाही आज तालुक्यातील एका मंगलकार्यालयात पार पडलेल्या लग्न सोहळ्याला वधू आणि वराकडून कोणतेही अधिकृत परवानगी न घेतल्याने आणि 50 हून अधिक व्यक्ती त्या लग्नाला उपस्थित असल्याने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी अचानक त्या ठिकाणी पथक पाठवून दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले. यावेळी वर आणि वधू दोघांनाही पाच हजार प्रमाणे दहा हजार रुपयांचा दंड आणि मास्क न वापरलेल्या दहा जणांना प्रत्येकी दोनशे प्रमाणे दोन हजार रुपये असा एकूण बारा हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी अशा कार्यक्रमांना परवानगी घेणे आवश्यक असून, या कार्यक्रमांना ५० हुन अधिक व्यक्ती दिसता कामा नये असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page