नवी दिल्ली /-

करोना आणि लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला जबर तडाखा बसला आहे. यावर उतारा म्हणून केंद्र सरकारने यापूर्वी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. पण, त्यावर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उद्योगांना फारसा आधार मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील या उद्योगांचे योगदान लक्षात घेता केंद्र सरकार आणखी एका पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावरील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी अर्थमंत्रालय मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. या उद्योगांनी भारतात यावे आणि आपले उत्पादन भारतात तयार करावे, यासाठी हे प्रोत्साहनपर पॅकेज असू शकते.करोना संसर्गामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेतला आहे.

या उद्योगांना भारतात आमंत्रित करण्याची तयारी यापूर्वीच करण्यात आली आहे. त्याच रणनितीचा हा भाग असू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.ज्या उद्योगांचा विचार करून या पॅकेजची आखणी केली जात आहे, त्यात प्रामुख्याने ऑटोमोबाइल, सौर पॅनेल निर्मिती, ग्राहकोपयोगी वस्तू, उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्या, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया यंत्रे, औषध निर्मिती कंपन्यांचा समावेश असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page