मसुरे /-

ओझर कंदळगाव मसुरे बांदिवडे रस्त्याच्या दुर्दशे बाबत लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती उदय परब यांच्या उपोषणास बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या उपोषणास बांदिवडे ग्रामस्थ सहभागी होणार असल्या बाबतचे ग्रामपंचयतचे पत्र उपसरपंच किरण पवार यांनी श्री परब यांच्या जवळ सुपूर्द केले आहे.
ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे ते आडवली रस्ता खड्डेमय झाला असून अनेक छोटे मोठे अपघात होऊन ग्रामस्थ जखमी होणे तसेच वाहनांचे नुकसान होत आहे. सदर रस्ता कामाबाबत २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यास ( रस्ता दुरुस्तीस प्रत्यक्ष प्रारंभ ) २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी सभापती उदय परब यांनी दिला होता.
आमदारांनी आठ दिवस मसुरे येथे वास्तव्य करावे आणि दुचाकी वाहनावरून कांदळगाव मार्गे प्रवास करावा म्हणजे येथील ग्रामस्थांच्या वेदना समजू शकतील. खराब रस्त्यामुळे दुचाकी वाहनावरून प्रवास करणाऱ्यांना मानेचा आणि पाठीचा त्रास सुरू झाला आहे तसेच दुचाकी वाहने खिळखिळी झाली आहेत. भविष्यात कितीतरी जणांना त्रास होणार असून ‘सदैव आपल्या सोबत’ म्हणणारे आमदार ग्रामस्थांच्या ह्या दुखण्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल सुद्धा माजी सभापती उदय परब ह्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता. उदय परब यांच्या सह कांदळगाव ग्रामस्थांच्या आंदोलनास बांदिवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांची साथ मिळणार असल्याने आंदोलनास अधिक ताकद मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page