मसुरे /-

मसुरे देऊळवाडा येथील दत्त मंदिर येथे घुमला नाद मृदुंगाचा सवे घेऊनी ढोलकीला ( ढोलकी भुलली मृदुंगाला) हा कार्यक्रम जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ यांच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता.पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या संकल्पनेतुन सदर कार्यक्रम मसुरे गावचे सुपुत्र व संगित विद्यालयाचे मार्गदर्शक पखवाज विशारद सचिन कातवणकर व शिष्यगण यानी सादर केला. कार्यक्रमाची सुरवात ताल आदी ताल ( १६ मात्रा) या तालात सयुक्त सह वादनाने करण्यात आली. तसेच यानंतर शास्त्रीय पद्धतीने वेगवेगळळ्या रचना सादर करण्यात आल्या.ढोलकी सोलो झाल्या नंतर शेवटच्या टप्यात पखवाज व ठोलकीची जुगलबंदी सादर करण्यात आली. कार्यक्रमाची संगता विनय वझे यांच्या गायनाने करण्यात आली. यावेळी लौकीक भोगले, गौरव लाड, ओंकार धुरी, भुषण नाईक, सुयश कातवणकर, गौरव वझे, रथराज तुरी, जय पेडणेकर, मंदार मुणगेकर, बिरबल शिंदे आदि वादकानी ढोलकी व मृदुघ वादनात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी समर्थ बागवे महाराज समस्थानचे अध्यक्ष महेश बागवे, अशोक बागवे, रामकृष्ण बागवे, गणपत बागवे, अनिल बागवे, प्रकाश बागवे, बाळा बागवे, प्रसाद बागवे, सागर बागवे, राहुल बागवे तसेच ग्रामस्थ यानी परिश्रम घेतले.आभार संगीत शिक्षक सचिन कातवणकर यानी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page