मसुरे /-

शिक्षण ही प्रक्रिया न संपणारी आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने गावातील सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य भेट देण्यात येत आहे. जिवनात मोठी ध्येय ठेवून अभ्यास करा. शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुलास शिक्षण व शिक्षणास लागणारे साहीत्य मोफत मिळावे या उद्देशाने आपण हा उपक्रम राबवित आहे. सातत्य आणि चीकाटी या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असुन यशाने हुरळुन न जाता अपयशाने खचु नका. असा मौलिक सल्ला ज्ञानसागर विद्यालय मुंबई येथील शिक्षक व बांदिवडे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सोनु सुधाकर सावंत यानी विद्यार्थ्याना दिला. बांदिवडे येथील श्री पावणाई भगवती मंदिर येथे आयोजीत शैक्षणिक साहीत्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.मागील पाच वर्षे गोंधळ कार्यक्रमाचे औचित्य साधुन बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्याना ते शैक्षणिक साहीत्य वाटप करतात. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य तसेच दहावी व बारावी मधुन प्रथम क्रमांकानी उतिर्ण झालेल्या विद्यार्थ्याना पारीतोषीक देण्यात आले.
यावेळी सोनु सावंत, श्वास चित्रपटाचे निर्माते मोहन परब,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मल खांब पट्टू शिवानी परब, अरुण भट, आप्पा गोविंद परब, अविनाश परब, चंद्रकांत प्रभु, मधुकर परब, दिनेश परब, सुभाष परब, शामसुंदर परब,साईप्रसाद प्रभु, सतिश बांदिवडेकर, प्रफुल्ल प्रभु, रंजन प्रभु, सौ निशा परब, प्रमोद परब, अरविंद परब,
के. के. सावंत, उत्तम परब, बलदेव प्रभु, प्रशांत परब, राजेंद्र परब, शाम परब, शंकर आईर, चारुदत्त परब, विष्णु परब, शाहीद सयैद, अमित परबउपस्थित होते. प्रास्ताविक विश्वनाथ परब तर आभार आनंद परब यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page